जळगाव । वयोवृध्द महिलांना हेरत धुमस्टाईल मंगलपोत ओढुन लांबविण्याचा प्रकार शहरातील वर्षा कॉलनी व गुजराथी गल्लीत (विसनजीनगर) रविवारी घडला. अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने दोघं घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून नारिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पत्ता विचारण्याचे बहाण्याने दोघं महिलांना बोलण्यात गुंग ठेवत चोरट्यांनी सोनसाखळी लांबविल्या आहेतय तर वर्षा कॉलनीतील महिलेला चोरट्यांनी कानशिलात लगावुन ते पसार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वृध्द महिलेच्या कानशिलात लगावून ओढली पोत
एकदिवसाआड शहरात सोनसाखळ्या चोरून मेहरुण परिसरातील वर्षा कॉलनीमध्ये नलिनी प्रल्हाद भोळे (वय 72) पती प्रल्हाद, मुलगा योगेश, सुन चारु व दोन नातवंडे अशांसोबत राहतात. रविवारी नलिनी भोळे ह्या सकाळी 7 वाजता फेरफटका मारण्यासाठी बाहेर गेल्या. घराजवळ नेहमीच्या ठिकाणी फेरफटका मारत असतांना दोन अनोळखी इसम पल्सर दुचाकीने भोळे यांच्याजवळ आले. यातील एकाने दुचाकी सुरु ठेवली. तर दुसरा तरुण मोटारसायकलच्या खाली उतरुन भोळेंना पत्ता विचारु लागला. कमी ऐकु आल्याने भोळे ह्या दोघांजवळ गेल्या. दोघांकडे असलेले व्हिजेटींग कार्ड पाहत असतांनाच बोलण्यात गुंतवून ठेवत खाली उतरलेल्या तरुणाने भोळे यांच्या कानशीलात लगावली आणि गळ्यातील तीन तोळ्याची मंगलपोत ओढत ती तोडून दोघं पसार झाले. घाबरलेल्या अवस्थेत भोळे यांनी आरोडा ओरड केली. घरजवळच असल्याने मुलगा योगेश यांच्यासह गल्लीतील शिरीष भंगाळे, संजय नेहते यांच्यासह नागरीकांनी गर्दी केली. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर भोळे यांनी एमआयडीसी पोलीसांना कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचुन घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी नलिली भोळे यांच्या खबरीवरुन अज्ञात दुचाकीस्वार तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन् अर्ध्या तासानंतर घडली दुसरी घटना
वर्षा कॉलनी तीन तोळ्याची पोत लांबविल्यानंतर भामट्यांनी विसंजनगर परिसराती गुजराथी गल्लीत जुन्या बि.जे.मार्केटकडून प्रवेश केला. त्या दरम्यान, रेखा चंद्रकांत कोठारी (वय 74) ह्या काँग्रेस भवनजवळील मंदिराज जावून भगवान महावीरांचे दर्शन घेवून मंदिरातून घरी जात असतांना घराजवळ आल्यानंतर हे दोन्ही चोरटे त्यांच्याजवळ येवून पुन्हा पत्ता विचारण्याचा बहाणा केला. आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 10 तोळ्याची सोनसाखळी लांबविली आणि पोत लांबवून ऑर्कीटमार्ग पसार झाले. पोत लांबविताच कोठारी या पळत पळत मुलगा ओजेश कोठारी, सुन शितल कोठारी, नातु करण, करिश्मा यांच्याकडे गेले. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ओजेश हे घराच्या बाहेर येत नाही तोच चोरटे पसार झाले होते.
सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा केला प्रयत्न
रेखा कोठारी यांनी आरोडा ओरड केल्याने चोरटे बी.जे.मार्केटकडे पसार झाले. याचवेळी लक्ष्मी ऍग्रोजवळील सुरक्षारक्षकाने चोरट्यांना हटकविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा दुचाकीचा वेग भन्नाट असल्याने ते त्यांना थांबवू शकले नाही. दरम्यान, शहरात गेल्या एक दिवसा आड पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सोनसाखळी लांबविल्याच्या घटना घडत असून यांना आळा कधी बसणार असा सवाल उपस्थित होत आहे.
सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद
कोठारी यांच्या घरासमोर अनिलकुमार पटेल यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या कॅमेरांमध्ये चोरटे कैद झाले आहेत. एकाने हेल्मेट घातले आहे. तर दुसर्याजवळ मार्केटींगसारखी बॅग दिसत आहे. तसेच वर्षा कॉलनीतील महिलेने सांगितलेल्या वर्णनावरुन दोघंही घटनांमधील चोरटे एकच असल्याचा अंदाज पोलीसांनी लावला आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, गुजराथी गल्लीत झालेल्या घटनेच्या ठिकाणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरधर निकम, सहाय्यक फौजदार शिवाजी वराडे, अजित पाटील, शेखर पाटील या पोलिस कर्मचार्यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.