लोणावळा : लोणावळ्याच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या माजी नगरसेविका अर्पणा बुटाला यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्त वैभवी आदर्श महिला पुरस्कार 2018 देऊन गौरविण्यात आले. ठाणे वैभव यांच्या वतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ठाणे वैभवचे प्रमुख निखिल बल्लाळ, चंद्रशेखर घोलप, प्रसाद जोशी, मच्छिंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.