अर्भकाला सोडून मातेचे पलायन

0

पिंपळेगुरव। देवकर पार्कमध्ये असलेल्या ‘साई अंगण’ इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील जिन्यात गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 10 ते 15 दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी इमारतीमधील रहिवासी भानुदास रामभाऊ वैद्यकर (वय 48) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘साई अंगण’ इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील पायर्‍यांवर एक लहान बाळ रडत असल्याचे वैद्यकर यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी सांगवी पोलिसांना कल्पना दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी गेले. त्यांनी चिमुकलीला पोलीस ठाण्यात नेले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.