अलंकापुरीतील मंदिरात जिल्हाधिकार्‍यांची पाहणी

0

आळंदी : अलंकापुरीतील पालखी सोहळ्याचे तयारी कामाची पाहणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनीकेली. या दौर्‍यात प्रांत आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे, तहसीलदार सबनीस, पोलीस ठाण्याचे प्रभारी दत्तात्रय दराडे, मुख्याधिकारी समीर भूमकर, मंडलाधिकारी चेतन चासकर, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आदी अधिकारी उपस्थित होते. वीर, सोहळ्याचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे उपस्थित अधिकारी यांच्याकडून तयारीची माहिती त्यांनी घेतली. शहरात फिरून पाहणी केली. विविध विकास कामाची माहिती त्यांनी घेतली. जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांचा सत्कार करण्यात आला.