आळंदी : श्रीचे पालखी सोहळ्याने आळंदीतील एक दिवसाचा पाहुणचार घेत पंढरीकडे जाण्यास हरिनाम गजरात आळंदीतून निरोप घेतला. माउलींचा सोहळा 2 दिवस पुण्यनगरीत विसावणार आहे. थोरल्या पादुका मंदिरापर्यंत जात सोहळ्यास निरोप दिला. आजोळघरी येथील क्षेत्रोपाध्ये सुधीर गांधी परिवाराने श्रींना रुद्राभिषेक आणि पादुका पूजन झाले. महानैवेद्य यानंतर पूजा आणि आरती तसेच उर्जितसिंह शितोळे सरकार यांचे तर्फे परंपरेने नैवेद्य झाला. दरम्यान, रात्री मुक्कामात समाज आरती, भाविकांचे दर्शन, हरिजागर भक्तिमय वातावरणात झाला.
भाविकांची दुतर्फा गर्दी
पहाटे श्रींचे सोहळ्याची तयारी होताच आळंदीतील ग्रामस्थांनी श्रींचे वैभवी पालखी नगरपरिषद चौकात सजवून ठेवण्यात आलेल्या पालखी रथात हरीगजर करत खांद्यावर आणली. यावेळी दुतर्फा भाविकांनी श्रींचे निरोप देण्यास गर्दी केली होती. माउली-माउली नामघोष करीत पालखी माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी पुष्प सजावटीने सजवलेल्या वैभवी चांदीचे पालखी रथात ठेवली. पालखी फुलांनी सजविलेला श्रींचा वैभवी चांदीचा लक्षवेधी दिसत होता. भाविकांनी येथे दर्शनास गर्दी केली. आळंदी नगरपरिषदे तर्फे देवस्थान समिती, मालक, चोपदार, दिंडीकरी या मानकर्यांचा सन्मान करण्यात आला.या वेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,उपनगराध्यक्ष सागर भोसरे,यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर,मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी स्वागत केले.
बुंदीचे वाटप
आळंदी पंचक्रोशीतील नागरिक, भाविकांनी श्रींचे पालखी सोहळ्यास निरोप देण्यास परिषद चौकात गर्दी केली .समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांचे हस्ते भाविकांना बुंदीचे वाटप करण्यात आले. रुग्णालयीन पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, प्रमुख मनोहर दिवाने ,सरपंच सुवर्णा ठाकरे, मंडूबाबा पालवे, महादेव पाखरे, अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते.