अलंकापुरीत मारुती मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोशणाई

0

आळंदी : माऊली मंदिर, हजेरी मारुती मंदिरासह तीर्थक्षेत्र आळंदीत विविध ठिकाणच्या श्री हनुमान मंदिरात प्रथापरंपरांचे पालन करीत मंगळवारी (दि. 11) हनुमान जन्मोत्सव साजरा होत असल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले.

विविध मठ, मंदिरे आणि धर्मशाळा तसेच परिसरातील पंचक्रोशीत श्री हनुमान जन्मोत्सवाचे सोहळ्यात श्रींचे जीवन चरित्रावर आधारित नामवंत कीर्तनकार, महाराज मंडळींची कीर्तन सेवा होत आहे. भाविक नागरिकांनी श्रींचे जन्मोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन चिताळकर पाटील यांनी केले आहे. हजेरी मारुती मंदिरातील जन्मोत्सवानिमित्त मंदिरावर प्रथमच आकर्षक विद्युत रोशणाई केल्याने मंदिर परिसर भाविक-नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. माऊली मंदिरातील प्रथांचे पालन करीत हरी भक्त पारायण बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे कीर्तन होणार आहे. यापूर्वी हनुमान जयंतीनिमित्त श्रींना रुद्राभिषेक विश्वस्त अभय टिळक यांचे हस्ते होणार असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.