नाताळ पर्व ; कॅरल सिंगींगसह प्रभू उपासना व विविध स्पर्धांचे आयोजन
भुसावळ: शहरातील अलायन्स मराठी चर्चतर्फे येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 19 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. त्यात कॅरल सिंगींगसह प्रभू उपासना व विविध स्पर्धा होणार आहे.
नाताळपर्वात असे होतील कार्यक्रम
मंगळवार, 19 रोजी सायंकाळी सात वाजता कॅरल सिंगींग, बुधवार, 20 रोजी सायंकाळी सात वाजता कॅरल सिंगींग, गुरुवार, 21 रोजी सायंकाळी सात वाजता कॅरल सिंगींग, शुक्रवार, 22 रोजी सायंकाळी सात वाजता कॅरल सिंगींग, शनिवार, 23 रोजी सकाळी नऊ व सायंकाळी सात वाजता चर्च स्वच्छता, डेकोरेशन व कॅरल सिंगींग, रविवार, 24 रोजी सकाळी नऊ व सायंकाळी सात वाजता प्रभू उपासना, सोमवार, 25 रोजी सकाळी नऊ वाजता ख्रिस्त जन्मोत्सव विशेष उपासना, मंगळवार, 26 रोजी दुपारी बारा वाजता स्पर्धा होतील. 27 रोजी सायंकाळी सहा वाजता संडे स्कूल कार्यक्रम, गुरुवार 28 रोजी सकाळी नऊ वाजता चर्च पिकनिक, शुक्रवार, 29 रोजी सकाळी दहा वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा, शनिवार, 30 रोजी सायंकाळी सात वाजता प्रितीभोजन, रविवार, 31 रोजी सकाळी नऊ व सायंकाळी नऊ वाजता प्रभू भक्ती, भजन, वॉच नाईट सर्व्हिस, सोमवार, 1 जानेवारी सकाळी नऊ वाजता नवीन वर्षाची उपासना व प्रभू भोजन होईल. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन फास्टर स्वप्निल पी.नाशिककर, अध्यक्ष प्रवीण ओहोळ, सचिव फिलीप फ्रान्सिस, खजिनदार प्रेमचंद जाधव, पंच जया फ्रान्सिस मणी व जॉन जे.रंगारे यांनी केले आहे.