अलास्का, कॅनडात भूकंप

0

लंडन : अलास्का व कॅनडातील काही भागांना मंगळवारी भूकंपाचा तीव्र हादरा बसला. या भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अलास्काच्या आग्नेय दिशेला होता. दरम्यान, या भूकंपामुळे अलास्का व अमेरिकेच्या किनार्‍यालगतचा परिसर आणि हवाई या भागांना त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे.

यामुळे या भागात राहणार्‍या नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अलास्काच्या आग्नेय दिशेला असलेल्या चिन्नेक या भागाला मंगळवारी सकाळी सर्वप्रथम भूकंपाचा हादरा बसला. त्याचवेळी कॅनडा व अमेरिकेच्या समुद्र किनार्‍यावरही हे धक्के जाणवले. अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने दिली आहे.