अलाहाबाद – जिल्ह्यातील सोराव येथे एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.
सोराव येथे खासगी कंपनीत नोकरी करणारा प्रताप सिंह, त्यांची पत्नी किरण, ७ वर्षांचा मुलगा विराट आणि सासु कमलेशदेवी यांची राहत्या घरीच हत्या झाली आहे. अलाहाबादचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक नितीन तिवारी यासह अनेक पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंतर्गत वाद किंवा लुट करण्याच्या हेतुने हा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी लोकांनी गर्दी केल्याने मोठे पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे.