अलिबागमध्ये रंगणार भव्य नृत्य स्पर्धा

0

मुरुड जंजिरा । सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्व. प्रभाकर पाटील काम करीत असताना त्यांना कला क्षेत्राची फार आवड होती. त्यावेळी काहीही सुविधा नसताना स्थानिक कलाकारांना व्यासपिठ मिळावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम ते घेत असत. प्रभाकर पाटील यांना कलेच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पीएनपी नाट्यगृहामध्ये जिल्हास्तरीय ग्रुप नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.