जळगाव । नाशिक सायकॅलिस्ट फाऊंडेशनतर्फे भर पावसात आयोजित 300 कि.मी. सायकल राईडमध्ये जळगाव रनर्सचे सायकॅलिस्ट अॅड.. सागर चित्रे यांनी सहभाग नोंदवुन अतिशय कठीण अशा मार्गावर हि रेस त्यांनी 18तास 54मिनिटांत पूर्ण केली. यातच त्यांनी तासनतास सुरू असलेल्या सुसाट वादळी पावसातही हिंमत न हारता सागर चित्रे यांनी सायकलिंक पुर्ण केली. दरम्यान, सागर चित्रे यांचा रनर्सग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला आहे.
18 तासात पुर्ण केली स्पर्धा
शनिवारी सकाळी पहाटे सहाला तीनशे किलोमीटरच्या लांबीच्या रपेटला सुरुवात झाली. त्यासाठी नाशिक-पिंपळगाव-नाशिक-कसारा घाट-भिवंडी (ठाणे)-कसारा घाट-नाशिक असा 300 कि.मीचा मार्ग ठरवण्यात आला होता व 20 तासाची मर्यादा देण्यात आली होती. नियमित सराव,अथक परिश्रम आणि झिद्दीच्या बळावर भर पावसात अश्यक्यप्राय अशा स्पर्धेत देखील अॅड.सागर चित्रेंनी हे यश संपादन केले हे कौतुकास्पद आहे. मागील महिन्यात सुद्धा त्यांनी डॉ.रवि हिरानी सोबत 200 कि.मी.चीअल्ट्रासायकलिंग धुळे-चांदवड-धुळे येथे पूर्ण केली होती. तसेच अॅड. चित्रे यांनी यापूर्वीही अनेक सायकलींग स्पर्धोंमध्ये सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, त्यांच्या या कामगिरीचा सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.