अल्पवयीन तरुणीचा गर्भपात ; एका विरुद्ध गुन्हा

0

नंदुरबार। अनैतिक संबंध ठेवून एका अल्पवयीन तरुणीला गर्भवती केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील नवी भोई गल्लीत राहणाऱ्या 15 वर्षच्या अल्पवयीन तरुणीशी सचिन भाईदास तायडे वय 30 वर्ष याने जवळकी साधून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवला,फेब्रुवारी ते मे 2018 या दरम्यान त्याने त्या तरुणीशी शाररीक संबंध ठेवले,त्यातून तिला दिवस गेल्याने ती गर्भवती राहिली,अशी फिर्याद मुलीच्याआईने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे,त्यानुसार सचिन तायडे याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,