बोदवड- अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिने प्रेम न केल्यास तिच्या आई-वडीलांना ठार मारू, अशी धमकी दिल्याप्रकरणी सूर्या मेहतर (पूर्ण नाव माहीत नाही) व चेतन सुरेश गायकवाड यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. साळशिंगी येथील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. तपास उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहेत.