अल्पवयीन तरुणीची जाळून घेत आत्महत्या

0

चाळीसगाव। शहरातील भिमनगर पॉवर हॉउस येथील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीने शुक्रवारी 25 रोजी सायंकाळी 6-30 वाजेच्या सुमारास राहते घरात अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.असुन शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अल्पवयीन तरुणी सपना रतन चव्हाण हिने घरात एकटी असतांना स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. आरडाओरडा ऐकुन शेजार्‍यांनी घराचा दरवाजा तोडुन तिला ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला मयत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिल्यावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत.