अल्पवयीन तरुणीचे लग्न लावणार्‍या पित्यासह प्रियकराविरुद्धही गुन्हा

0

भुसावळ- अल्पवयीन तरुणीला सज्ञान दाखवत तिचे लग्न लावल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांत तरुणीच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर ही तरुणी माहेरी आल्यानंतर तिला पळवून नेणार्‍या प्रियकराविरुद्धही वरणगावत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे. तालुक्यातील टहाकळी येथील 13 वर्षीय मुलीला सज्ञान दाखवून तिचे पाच महिन्यांपूर्वी एरंडोल येथील युवकाशी लग्न लावण्यात आले होते. मुलगी सासरी न राहता माहेरी परत आली होती. त्यानंतर 11 मे रोजी सागर प्रमोद तायडे (20) याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. या घटनेनंतर मुलीच्या वडीलांनी मुलगी सज्ञान असल्याची कागदपत्रे तयार करून वरणगाव पोलिसात हरवल्याची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना 17 मे रोजी पळून गेलेले दोघे परत आले. त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याने पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांनी या प्रकरणी फिर्याद ल्यिावरून तरुणीच्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी संशयीत सागर तायडे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.