अल्पवयीन तरुणीला धमकी : लग्न न केल्यास पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी : जामनेर तालुक्यातील तरुणाला अटक

If she doesn’t get married, She Will Burn Him To Death : Threat to a minor Girl in Jamner Taluka : Accused Arrested जामनेर :  अंगणात उभ्या असलेल्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करीत माझ्याशी लग्न कर अन्यथा तुला पेट्रोल टाकून जिवंत ठार मारेल, अशी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यात घडली. या प्रकरणी जामनेर पोलिसात अविनाश प्रल्हाद देवरे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अंगणात पीडीतेचा विनयभंग
जामनेर तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन पीडीता गुरुवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अंगणात उभी असतांना अविनाश देवरे हयाने पीडीतेचा हात धरत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले तसेच माझ्यासोबत लग्न कर नाही तर, मी तुला पेट्रोल टाकून मारुन टाकेल, अशी धमकी दिली. पीडीतेच्या आईने तरुणाला हटकल्यानंतर संशयीत घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अविनाश देवरेविरुद्ध विनयभंगसह पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली. पुढील सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.