अल्पवयीन तरुणीला पळवले : भुसावळातील आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- महाविद्यालयीन शिक्षणासाठी निघालेल्या अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहरातील 22 वर्षीय तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शहरातील एका भागातील 17 वर्षीय तरुणी महाविद्यालयात जात असल्याचे सांगून निघाली मात्र घरी न परतल्याने 14 रोजी बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तरुणी व तरुणी बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तरुणीसह संशयीत आरोपी मंगेश अंबादास काळे (22, रा.कृष्णा नगर, भुसावळ) यास ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध यापूर्वीदेखील पोलिसात गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार तस्लिम पठाण, हवालदार जयराम खोडपे, चंद्रकांत बोदडे, दीपक जाधक, संगीता चौधरी आदींच्या पथकाने केली.