अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : संशयीत आरोपीस रावेर पोलिसांकडून अटक

0

रावेर- ओळखीचा फायदा घेत तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीवरव अत्याचार करणार्‍या आरोपीस रावेर पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पूर्व ओळखीचा फायदा घेऊन तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीला संशयीत आरोपी इम्रान मो. (25) याने फूस पनवेल येथे पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला होता. या प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीस नुकतीच पनवेल येथून अटक केल्यानंतर रावेर न्यायालयात हजर केले असता त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर जाधव, नाईक हरीलाल पाटील, कॉन्स्टेबल जाकिर पिंजारी, मेढे, नीलेश चौधरी आदींनी केली.