अल्पवयीन तरुणीस पळवले, अडावदच्या युवकाविरुद्ध गुन्हा

0
अडावद :- शहरातील एका नगरातील अल्पवयीन तरुणीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी मयुर सुरेश मराठे या संशयीत युवकाविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
4 रोजी शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाली. शोध घेऊनही ती न सापडल्याने तरुणानेच तिला पळवल्याचा संशय आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतीराम राठोड करीत आहेत.