भुसावळ- लग्नाच्या आमिषाने चिनावल येथील अल्पवयीन तरुणीस पळवून नेल्याप्रकरणी संशयीत आरोपी अजय सुनील तायडेविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 22 रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपीला जामिन मिळण्यासाठी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे अॅड.भूपेश विश्राम बाविस्कर यांनी अर्ज केल्यानंतर बुधवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.