भुसावळ- वराडसीम येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वराडसीम येथील 17 वर्षीय तरुणीशी गणेश विठ्ठल पाटील याचे प्रेमसंबंध होते. 19 मार्च 2016 रोजी संशयीत आरोपीने तरुणीस लग्नाच्या आमिषाने पळवून नेल्यानंतर तरुणीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या जवाबात तफावत आढळल्याने संशयाचा फायदा देत जिल्हा न्यायाधीश शित्रे यांनी संशयीत आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे अॅड.संभाजी जाधव तर आरोपीतर्फे अॅड.मनीष सेवलानी यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.फिरोज शेख यांनी सहकार्य केले.