प्रेकरणातून मृत्यूला कवटाळल्याचा संशय
चाळीसगाव– तालुक्यातील बहाळ येथील एका शेतात अल्पवयीन तरुण-तरुणींनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी रात्री 12 वाजेनंतर ही घटना उघडकीस आली. रितेश उर्फ विनोद रामदास झोडगे (17) व सोनल कुंदन ढोले (15, भोई) अशी मयतांची नावे आहेत. मयत विनोद झोडगे यांच्या पित्याचे गुढे रस्त्यालगत शेत असून तेथेच त्यांनी शनिवारी रात्री गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. उभय तरुण-तरुणी शुक्रवारी रात्रीच घरातून गायब झाल्याने त्यांचा शोध सुरू असताना त्यांनी आत्महत्या केल्याची घटना कळताच गावात खळबळ उडाली. दोघांचे मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. नातेवाईकांना ही घटना कळताच शोककळा पसरली.