चाळीसगाव । शहरातील हिरापूर रोड वरील शाळेजवळून व जुन्या मालेगार रोडवरून वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघा तरूणांनी दोन अल्पवयीन तरूणींना फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दोन तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील मालेगाव नाका श्रीराम सोसायटी येथील राहते घरून एका 17 वर्षीय अल्पवयीन तरूणीस आरोपी अजय राधेश्याम चौधरी (रा. शिवकॉलनी) याने तर दुसर्या घटनेत शहरातील डेराबर्डी पाण्याच्या टाकीजवळ राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 25 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हिरपूर रोडवरील रा.वि.कन्या शाळेजवळून संशयीत आरोपी कुणाल रमेश साठे (रा.पुनतांबे, ता.शिर्डी जि. अहमदनगर ह.मु.बोरघरे वस्ती, सुदयवाडा, पुणे) यांनी लग्नाचे आमीष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडीलांनी दिल्यावरून दोन्हा आरोपी अजय चौधरी व कुणाल राठे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.