अल्पवयीन बालिकांवर अत्याचार : गातेतील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

सावदा : अल्पवयीन दोघा बालिकांवर अत्याचार केल्याप्रकरणी गाते येथील अरुण यशवंत मेढे उर्फ डॉक्टर बाबा मेढे (52) यास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीने चॉकलेट व पैसे देण्याच्या बहाण्याने बालिकांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडीत बालिकांनी कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर सावदा पोलिसांत ईन कॅमेरा फिर्याद नोंदवण्यात आली होती. दरम्यान, आरोपी मेढे याला रावेर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.