अल्पवयीन बालिकेचा बालविवाह : 11 संशयीतांविरोधात गुन्हा

Child Marriage of a Minor girl in Chalisgaon Taluka : Case Against 11 Suspects चाळीसगाव : अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकर चाळीसगाव तालुक्यातील लोंजे घडला असून या प्रकरणी पतीसह 11 संशयीतांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पतीसह 11 संशयीतांविरोधात गुन्हा
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील लोंजे येथील रहिवासी असून सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वास्तव्याला आहे. 15 जून 2021 रोजी दुपारी एक वाजता अल्पवयीन मुलीचा बालविवाह गोकुळ कैलास पवार यांच्याशी करून दिला मात्र अल्पवयीन असताना व लग्नाबाबत काहीएक कळत नसल्याची माहित असताना देखील हा गुन्हा संशयीतांनी केल्याने पीडीतेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी चौकशी केली.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
15 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी तथा पती गोकुळ कैलास पवार, चुलत सासरे अरुण फुलसिंग पवार, चुलत दीर सजन रतन पवार, सासरे कैलास फुलसिंग पवार, चुलत दीर ज्ञानेश्वर बाबुलाल पवार, दीर धनराज कैलास पवार, चुलत दीर रवींद्र युवराज पवार (सर्व रा. लोंजे, ता.चाळीसगाव), भाऊसाहेब रामलाल सोनवणे, अल्पवयीन मुलीची आई विमलबाई सोनवणे, सावत्र आजोबा अण्णा अभिमन मालिक, आजी कलाबाई अण्णा मलिक (चौघे रा.मालेगाव, जि.नाशिक) यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.