रावेरमध्ये तेली समाज मंडळातर्फे तहसीलदारांना निवेदन
रावेर– दोंडाईचा येथील पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला फाशीवर लटकवा व या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी समस्त तेली समाजाकडून करण्यात आली. याबाबत गुरुवारी तहसीलदार विजयकुमार ढगे यांना निवेदन देण्यात आले. दोंडाईचा येथे बालिकेवर अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर रावेर शहर तेली समाज पंच मंडळातर्फे निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
नगरसेवक अॅड.सुरज चौधरी, विलास चौधरी, भूषण चौधरी, समाज अध्यक्ष नारायण चौधरी, गोपाल चौधरी, समाज उपाध्यक्ष भगवान चौधरी, अशोक चौधरी, पांडुरंग चौधरी, प्रकाश चौधरी, संतोष चौधरी, संजय चौधरी, अनिल चौधरी, कडू चौधरी, रवींद्र चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, भूषण महाजन, भागवत चौधरी, सुभाष चौधरी, अनिल चौधरी आदी समाजबांधव उपस्थित होते.