पिंपरी : रागाच्या भरात एका अल्पवयीन मुलाने रस्त्याकडेला उभा असलेला रिक्षा व टेम्पो यांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे. रमेश ढवळे (वय 40, रा. बालाजीनगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री साडेअकराच्या सुमारास संबंधित 17 वर्षीय मुलगा व त्याचे साथीदार यांनी कंपनीसमोर उभा केलेली रिक्षा व टेम्पो यांची रागाच्या भरात तोडफोड केली. यामध्ये 25 हजारांचे नुकसान झाले आहे.