उल्हासनगर । कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण घेत लोकल ट्रेनमध्ये फेरी व कॉसमेटिकची विक्री करणार्या 16 वर्षीय मुलाचा धावत्या लोकल गाडीमधून खाली पडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरात घडली. मयत झालेल्या मुलाचे नाव अनिल दिलीप गुप्ता(16) आहे. तो कॅम्प नं. 4 येथील भीम कॉलेनी परिसरात राहत होता.
त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. तो इयत्ता 10 वीत शिकत होता. शिक्षणाबरोबर आपल्या घरच्यांना आर्थिक मदत व्हावी याकरीता तो लोकल ट्रेनमधील महिला डब्यात कॉस्मेटीककचे सामान विकायचा. तो लोकल ट्रेनमध्ये फेरीवर कॉस्मेटीक वस्तू लेडिज डब्यात विकत असताना उल्हासनगर ते विठ्ठलवाडीच्या दरम्यान त्याचा दरवाजातून तोल गेल्याने तो धावत्या लोकलमधून खाली पडला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद आहे.