अल्पवयीन मुलाला मारहाण करुन लुटले

0

पिंपरी : कासारवाडी येथील नाशिक फाटा येथे मंगळवारी (दि.21) रात्री अकराच्या सुमारास एका अल्पवयीन मुलास मारहाण करत पाच हजार रुपये लुटले. या घटनेत जनार्दन रमेश गावीत (वय 14, रा. नाशिक) असे मुलाचे नाव आहे. कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये तो काम करतो. तो मित्रांसोबत गावी निघाला होता.

मात्र, मित्र ज्या गाडीत चढले त्या गाडीत त्याला जागा नव्हती. त्यामुळे तो नाशिक फाटा येथे दुसर्‍या गाडीची वाट बघत थांबला. त्यावेळी तीन अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण केली. नंतर त्याला दापोडी येथील सीएमई जवळ टाकून दिले. यामध्ये जनार्दनच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्याच्यावर वायसीएम येथे प्रथमोपचार करण्यात आले.