चाळीसगाव । शहरातील सुवर्णाताई नगरातील कानाफाडी मंदीराजवळ खेळण्याच्या बहाण्याने नेवुन दारु पाजुन एकाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलाशी गैरकृत करुन त्याला गंभीर जखमी केल्याची जळबळजनक घटना 6 रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी शहरातील सुवर्णाताई नगरमधील रहिवाशी असलेल्या समवयस्क संशयीत आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन तरुणास कानफाडी बाबा मंदीराजवळ लपाछपी खेळण्याचे सांगुन नेले. मात्र त्याठिकाणी त्याने दारु पाजून दृष्कृत्य केले. यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलाला पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडीकल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी 7 रोजी रात्री पिडीत मुलाच्या आईचा जबाब धुळे येथे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घेतला असुन संशयीत आरोपीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासुन संरक्षण 2012 चे कायदा कलम 3 ब 4, 5 आय 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे करीत आहेत.