अल्पवयीन मुलीचा जळगावात विनयभंग

जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको भागातील अल्पवयीन मुलीचा झोपेत असतांना विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाविरोधात गुन्हा
शहरातील पिंप्राळा हुडको परीसरातील अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 4 जून रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही झोपेत असतांना गल्लीतील संशयीत आरोपी तनविर शेख जलील शेख (23) याने अल्पवयीन मुलीशी अंगलट करून विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने तन्वीर शेख जलील शेख याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.