Minor girl forced into prostitution after forced marriage: case against four जळगाव : एका जिल्ह्यातील अल्पवयीन तरुणीला बळजबरीने विवाह लावून नंतर तिला वेश्या व्यवसायात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
परभणी जिल्ह्यातील येथील एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील प्रमुख संशयीत आरोपी महिलेने पिडीत अल्पवयीन मुलीला तिच्या दिर व दिराणी तसेच दिराचा शालक अशा तिघांना वेश्या व्यवसायासाठी विक्री केले तर यातील संशयीत आरोपी असलेल्या महिलेच्या दिराच्या शालकासोबत बळजबरी बालविवाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने फिर्यादीत केला आहे.
जळगावातील घटनेने खळबळ
मंगळवार, 23 ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.