कल्याण । डोंबिवली पूर्वेकडील सोनार पाडा परिसरात राहणारी सदर पीडित अल्पवयीन मुलगी (१०) गुरुवारी दुपारी आपल्या घरात झोपली असताना तिचे सावत्र वडील घरात आले. त्यांनी या मुलीशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदर मुलगी घाबरली. तिने याबाबत आपल्या आईला सांगितले असता तिच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत वासनांध सावत्र बापाविरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी सावत्र बापाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.