अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

पिंपरी : आई घरात नसताना पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरत एका 14 वर्षीय मुलीची छेड काढली. याप्रकरणी अण्णा बबन कांबळे (रा. वाकड) याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात विनय भांगाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कांबळे फरार झाला आहे. पीडित मुलीची आई परिसरात धुणी भांडी करण्याचे काम करते. काही दिवसांपूर्वी आई कामावर गेल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने कांबळे घरात आला व त्याने पीडितेची छेड काढली. या घटनेची पीडितेने आईला माहिती दिली. माहिती मिळताच आईने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस फरारीचा शोध घेत आहेत.