Rape Of School Girl In Pachora Taluka : Accused Gets Three Years Sentence जळगाव : अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग करणार्या आरोपीला तीन वर्ष शिक्षेसह आठ हजार रुपये दंड जळगाव न्यायालयाने सुनावला.
पाठलाग करीत केला विनयभंग
जुलै 2017 मध्ये आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत असताना विजय प्रकाश घोडेश्वर (19, भडगाव) याने पीडित मुलीच्या शाळेत व इतर रस्त्यावर तिचा पाठलाग करीत विनयभंग केला होता. याबाबत पीडीत मुलीच्या मामाने संशयीत आरोपीला पकडून पाचोरा पोलीस ठाण्यात जमा केले होते. याबाबत पीडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून विजय घोडेस्वार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडीतेचा साक्ष ठरली महत्त्वाची
या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. जळगाव जिल्हा न्यायालयाच्या पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.एस. महाजन यांच्या न्यायालयासमोर खटला चालविण्यात आला. यामध्ये पीडीतेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. साक्ष व पुराव्या अंती न्यायालयाने विजय प्रकाश घोडेस्वार (19) दोषी ठरवत त्याला विविध कलमान्वये तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि 8 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने सक्त मजुरीचे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी हवालदार विजय पाटील यांनी सहकार्य लाभले.