A minor girl was molested by threatening to kill her parents पाचोरा : तालुक्यातील एका गावातील रहिवासी व शिक्षण घेत असलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना सोमवार, 5 रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाठलाग करीत केला विनयभंग
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अल्पवयीन मुलगी ही शेताजवळून पायी जात असताना 14 वर्षीय संशयीताने दुचाकीने तिच्यामागे येत तू काय इतकी भाव खाते, तु मला आवडते, घरी जाऊन कोणाला सांगू नको, असे सांगून तिचा विनयभंग केला तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना ठार मारेल, अशी धमकी दिली. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.