बोदवड : भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी पाच संशयीतांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह तालुक्यातीलच पिंपळगाव खुर्द येथील तरुणासोबत लावल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी मुलीच्या आप्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवडला झाला अल्पवयीन मुलीचा विवाह
एकात्मिक बालविकास अधिकारी दमयंती इंगळे यांना बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोदवड पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, महिला बालविकास अधिकारी प्रतीक जगदीश पाटील यांना कळवले. पथकाने धाव घेतली असता बोदवड शहरात विवाह बोदवड येथे नातेवाईकांच्या संमतीने पार पडला होता. बालिकेचे वय केवळ 15 वर्षे तीन महिने 17 दिवस असतानाही ब्राम्हणासह व इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हा बालविवाह लावण्यात आल्याने या प्रकरणी मुलीची आई उषाबाई श्रीपत ठाकरे, नवरदेवाचे वडील रमेश पुंडलिक बडगुजर (बोदवड, ह.मु.पिंपळगाव, ता.भुसावळ), नवरदेवाची आई राजश्री रमेश बडगुजर, नवरदेव स्वप्नील रमेश बडगुजर, दामू भावसिंग मोरे (बोदवड) तसेच लग्नास उपस्थित ब्राह्मण, कॅमेरामन, लग्नाला उपस्थित वर्हाडींविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला व बालविकास अधिकारी प्रतीक पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.