अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग

0

कल्याण : कराटे शिकवन्याच्या बहाण्याने एका कराटे प्रशिक्षकाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा संताप जनक घटना घडली आहे. डोंबिवली पुर्वे परिसरात राहणारी सदर पीडित 12 वर्षीय मुलगी काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली येथे कराटे शिकण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा प्रशिक्षक मानसिंग याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सांगितले .सदर मुलीच्या आईने या घडल्या प्रकारा बाबत डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मानसिंग विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान मानसिंग फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.