जळगाव । 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सौदा करुन तिचा विवाह करण्याचा प्रयत्नात असलेल्या तिघांना जिल्हापेठ पोलिसांनी बसस्थानक परिसरातून दि.6 रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर या अल्पवयीन मुलीची बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली होती. चौकशीनंतर बालनिरीक्षणगृहातील अधिक्षक यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाचा विवाह करणार्या सात जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात: मालेगाव येथील पिडीत अल्पवयीन मुलीचा मानलेला मामा शेख फारुख शेख अल्लाउद्दीन रा. मालेगाव यांने जीवनासाथी मॅरेज ब्युरोचे संचालक जिगर पिंजारी (रा. मास्टर कॉलनी) व सरफराज तडवी व त्यांची पत्नी नजमा सरफराज राठोड (रा. शिवाजी नगर) यांच्या मार्फेत गुजरात राजकोट येथील धर्मेश नटरवलाल चुडासामा याचा ओळखीचे भानुबाई हासम शहा व तीचे पती हासन शाहा जुम्मा शहा यांनी या अल्पवयीन मुलाचा सौदा करून तिचा विवाह निश्चित केला होता. स्टॉम्पपेपर तिच्या स्वाक्षर्या देखील घेतल्या होता.या अल्पवयीन मुलीला घेवून जात असतांना नवीन बसस्थानकावर यातील तिघांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान अल्पवयीन मुलीला बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते.
चौकशीअंती सात जणांवर गुन्हा
बालनिरीक्षकगृहातील अधिक्षका जयश्री पाटील यांच्या फिर्यादीवरून शेख फारुख शेख अल्लाउद्दीन रा. मालेगाव जीवनसाथी मॅरेज ब्युरो, जिगर पिंजारी रा. मास्टर कॉलनी, सरफराज राठोड व नजमा राठोड रा. शिवाजी नगर, भानुबाई हासम शहा शामदार, हासन शहा जुम्मा शाहा शामदार रा. राजकोट, धर्मेश नटवरलाल चुडसामा विरुध्द भादवी कलम 370 सह बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 चे कलम 7 व 11 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.