तरुणासह मुलीचे पालकही पोलीस ठाण्यात ; आठ महिन्यांपासून काढत होता छेड
जळगाव- गेल्या आठ महिन्यात वारंवार 15 वर्षीय मुलीची छेड काढून तिला त्रास दिला. नवरोत्सवादरम्यान मुलीला इशारे करुन तिची छेड काढली. मुलीने कुटुंबियांना ही आपबिती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तरुणाचे घर गाठले व त्याला झोडपत झोडपतच पोलीस ठाण्यात आणल्याचा प्रकार सोमवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडला. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्यातही पोलिसांसमोर या तरुणाला मारहाण झाली.
शहरातील शनिपेठ परिसरातील 15 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबांसह राहते. तीन एका शाळेत नववीच्या वर्गाला आहे. तिला गल्लीतीलच एक तरुण आठ महिन्यांपासून त्रास देत आहे. या तरुणाने मुलीच्या लहान भावाच्या माध्यमातून ओळखी केली. अन् मुलीच्या शाळेत जावून तिला छेड काढण्यात सुरुवात केली. अनेकदा शाळेच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणांना हटकले. मात्र यानंतरही तरुणाने एका मुलीला छेड धमकी दिली. भितीने हा प्रकार मुलीने कुटुंबियांना सांगितला नाही. यानंतर नवरात्रोत्सवदरम्यान या तरुणाने मुलीला गाठले. तिला हातवारे करुन वेगवेगळे इशारे केले. मानसिक त्रास असह्य झाल्याने मुलीने कुटुंबियांना आपबिती सांगितली.
तरुणाला त्याच्या घरुनच झोडपत आणले पोलीस ठाण्यात
गल्लीतील तरुण छेड काढत असल्याचा प्रकार समजल्यावर मुलीचे काका, वडील तसेच नातेवाईकांनी सोमवारी दुपारी तरुणाचे घर गाठले. व त्याला घरुनच चोप देत शनिपेठ पोलीस ठाण्यात आणले. मारहाणीदरम्यान तरुणाचे कपडे फाटले होते. आहे त्याच अर्धनग्न अवस्थेत तरुणाला नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्यात एकच गर्दी जमली होती. संताप अनावर झाल्याने मुलीच्या काकाने शनिपेठ पोलीस ठाणे आवारातही तरुणाला कानशिलात लगावत मारहाण केली.
तरुणाच्या कुटुंबियांनी गाठले पोलीस ठाणे
शनिपेठ पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांंनी मुलीची संवाद साधून नेमक्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. माहिती मिळताच तरुणाच्या आई वडीलांनीही शनिपेठ पोलीस ठाणे गाठले. उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. तरुण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असल्याची माहिती मिळाली आहे.