अल्पवयीन मुलीचे अपहरण

0

जळगाव । तालुक्यातील रायपुर येथील अल्पवयीन मुलीस अज्ञात लोकांनी फुस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी घडली. मुलीच्या कुटूंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात संशयीतांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालूक्यातील कुसूंबा गावाजवळील रायपुर ग्रामपंचायती समोर वास्तव्यास असलेल्या जोगींदर भारत गिरी (वय-40.मुळ राहणार सिध्दार्थनगर, रोईपुरा नेपाळ) यांनी औद्योगीक वसाहत पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, रायपुर ग्रामपंचायत कार्यालया समोरच वास्तव्यास असलेल्या कुटूंबातील एकट्या मुलीस अज्ञात संशयीतांनी फुसलावून पळवून नेले आहे. या प्रकरणी औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली असुन तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागुल करीत आहे.