Minor Girl Assaulted In Pahoor Area : Youth Arrested पहूर : परीसरातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत दोन वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडीतेच्या फिर्यादीनंतर पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर संशयीत आरोपीला अटक करण्यात आली.
अपहरण करीत दोन वेळा अत्याचार
पीडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यानुसार तू सोबत आली नाही तर तुझी बदनामी करेल, अशी धमकी देत गणेश भगवान भील याने पीडीत मुलीचे अपहरण करीत दोन वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केलेत तसेच बदनामी करेल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी गणेश भिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताला अटक करण्यात आली असून तपास पोलिस उपनिरीक्षकदिलीप पाटील करीत आहेत.