Kidnapping of minor girl : Crime against both पहूर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन जणांनी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना शनिवार, 3 रोजी घडली. या प्रकरणी सोमवारी पहूर पोलिस ठाण्यात बंटी भगवान गायकवाड (शेंदुर्णी) व श्रावण संतारा भील (पहूर, ता.जामनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फूस लावून पळवत केले अपहरण
जामनेर तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी परीरवारासह वास्तव्यास असून संशयीत बंटी भगवान गायकवाड (शेंदुर्णी) व श्रावण संतारा भील (पहूर, ता.जामनेर) यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काहीतरी आमिष दाखवत फूस लावून तिचे अपहरण केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र अल्पवयीन तरुणी न आढळल्याने पहूर पोलिस ठाण्यात दोघा संशयीतांविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.