दौंड । मलठण येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार दौंड पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिली आहे. शनिवारी मध्यरात्री घरात सर्वजण झापले असताना तिच्या आईला जाग आली. त्यावेळी मुलगी घरात नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु ती कुठेही मिळून आली नाही. म्हणून अज्ञात व्यक्तीविरोधात मुलीच्य वडिलांनी तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.