पाचोरा। सोयगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन कु्रर हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली.
अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध करुन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पाचोरा तालुका शिवसेना युसासेनातर्फे करण्यात आला आहे. मागणीचे निवेदन पाचोर्यांचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांना देण्यात आले. बापु हटकर, जितेंद्र पेंढारकर, संतोष हटकर, पप्पु राजपुत, अनिल सावंत, जावेद शेख, सुधाकर महाजन, संदीप पाटील, अतुल महाजन, अनिकेत सुर्यवंशी, खंडू सोनवणे, विजय भोई, वैभव राजपुत, वाल्मीक जाधव, शरद पोळ यांनी केली आहे.