अल्पवयीन मुलीला घरातून पळवून नेत अत्याचार : आरोपी तरुणाला अटक
पीडीता रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी : उचंदा भागातील शेतात सलग तीन दिवस केला अत्याचार
रावेर : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर सलग तीन दिवस अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक धक्कादायक घटना उचंदा, ता.मुक्ताईनगर गावाजवळील एका शेतात घडली. या प्रकरणी आरोपी जीवन सुधाकर पाटील (21, घोडसगाव, ता.मुक्ताईनगर) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार
रावेर तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी जीवन पाटील याने सोमवार, 11 जुलै रोजी दुचाकीवरून पळवून नेत उचंदा गावाजवळील एका शेतातील झोपडीत नेत सलग तीन दिवस अत्याचार केला. या प्रकरणी या प्रकरणी रावेर पोलिसात आरोपीविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.