अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : निंभोर्‍यातील घटना

रावेर : तालुक्यातील निंभोरा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगी ही कुटुंबीयांसह राहते. 21 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास कोल्हे करीत आहे.