सावदा : रावेर तालुक्यातील मस्कावद येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रावेर तालुक्यातील मस्कावद येथील 15 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून मुलगी व तिचे कुटुंबिय हे मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी आहेत. कामाच्या निमित्ताने ते मस्कावद परीसरात राहतात. 10 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता सर्वजण घरात झोपलेले असता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार 11 जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.