अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव : निमखेडी गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार, 9 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी असताना अर्जुन ईश्वर सपके (जैनाबाद, जळगाव) याने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडीलांनी संशयीत अर्जुन सपके विरोधात तक्रार दिल्यानंतर शुक्रवार, 10 जून रोजी दुपारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.