अल्पवयीन मुलीला लव्ह लेटर देणार्‍या तरुणाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा !

Stalking minor girl and giving love letter: Crime against youth in Pachora taluka पाचोरा : शाळकरी विद्यार्थिनीचा शिकवणीला जाताना पाठलाग करीत तिला लव्ह लेटर देणार्‍या पाचोरा तालुक्यातील एका गावातील तरुणाविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, अशा आशयाचे लव्ह लेटर दिल्याप्रकरणी पीडीत तरुणीच्या फिर्यादीवरून संशयीत प्रवीण उर्फ सोन्या बापू गरुड (19, रा.पाचोरा तालुका) याच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा
पाचोरा तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेला संशयीत प्रवीण उर्फ सोन्या याने अल्पवयीन मुलीचा ऑक्टोंबर 2021 ते आजपावेतो शाळेत व ट्युशनला जाताना पाठलाग केला तसेच गुरुवार, 24 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडीत मुलीच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिला त्याच्या दुचाकीवरून घरी नेण्यात आले तर यापूर्वी ऑक्टोंबर 2021 मध्ये ती सज्ञान नसल्याचे माहित असूनही चिठ्ठी देवुन त्यात ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, असा आशयाचा मजकुर लिहून पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहेत.